Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: 28 पोलिस उपअधीक्षकपदांसाठी 62 जण शारीरिक चाचणीस पात्र

Goa Police: पोलिस खात्यातील 28 उपअधीक्षक पदांसाठी आता केवळ 62 उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Police: पोलिस खात्यातील 28 उपअधीक्षक पदांसाठी आता केवळ 62 उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. निवडणुकांमुळे शारीरिक चाचणी घेण्यास गोवा लोकसेवा आयोगाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने नकार दिल्याने आता तज्ज्ञांकरवी आयोगच ही चाचणी घेणार आहे.

25 वर्षांच्या खंडानंतर थेट पद्धतीने पोलिस उपअधीक्षक पदे भरण्यात येत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी 2 हजार 400 जणांनी अर्ज केले होते.

त्यापैकी केवळ 1 हजार 850 जण भरतीपूर्व चाचणीला सामोरे गेले. त्यापैकी 93 जण संगणकावर आधारीत परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

त्यांनी काल रविवारी ही परीक्षा दिली आणि त्यापैकी केवळ 62 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.

इंग्रजी, मानवाधिकार, धोरणे, इतिहास, भूगोल, तर्कशास्त्र याविषयावर आधारीत संगणकीकृत प्रश्न 75 गुणांसाठी विचारले होते आणि उत्तरे देण्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT