Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत ६० हेक्टरांतील रोपे कुजली; शेतकऱ्यांना मोठा फटका

plants rotted : बागायतीलाही फटका कृषी खात्याकडून प्राथमिक पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू असून, या पावसाचा शेतकरी आणि बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. सततधार पडणाऱ्या पावसामुळे डिचोलीत बहुतांश भागात भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, काही भागात बागायतींनाही पावसाचा फटका बसला आहे.

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पावसाच्या तडाख्यामुळे डिचोलीत जवळपास ६० हेक्टर भातशेती, तर १० हेक्टर बागायतींची नासाडी झाली आहे.

यंदा मॉन्सून वेळेवर सक्रिय झाल्यामुळे बळीराजा मोठ्या उमेदीने शेतीत उतरून शेतकामात मग्न झाला होता. पेरणी आणि तरवा लागवडीच्या कामावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले असतानाच, पावसाचा धुमाकूळ सुरू झाला. मुसळधार पावसामुळे मये, पिळगाव, शिरगाव, साळ, मेणकूरे आदी भागातील भातशेती पाण्याखाली गेली.

आठवडाभर शेती पाण्याखाली राहिल्याने लावणीसाठी तयार झालेला तरवा कुजून गेल्या, केलेली पेरणीही वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत आणि पैसे वाया गेले आहेत. अजूनही शेती पाण्याखाली आहेत.

पावसाच्या कहरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भातशेतीसह कुळागरे,बागायतींनाही तडाखा बसला आहे. अडवलपाल, नार्वे, वाठादेव आदी भागातील मिळून जवळपास १० हेक्टर बागायती पिकाची हानी झाली आहे.

सध्याच्या पाहणीनुसार पाण्याखाली गेल्याने जवळपास ६०हेक्टर शेती तर १० हेक्टर बागायती पिकाला नुकसानीचा तडाखा बसला आहे. पावसाचा तडाखा बसलेल्या भागात पाहणी करण्यात येत आहे. मये, शिरगाव भागात पाहणीवेळी आमदार प्रेमेंद्र शेट हे उपस्थित होते. शेतकरी, बागायतदार संपर्क साधतात, त्याप्रमाणे कृषी अधिकारी शेती, बागायतींची पाहणी करतात. शेती, बागायतीच्या नुकसानींचा अहवाल तयार करण्यात येत आहे.

-दीपक गडेकर, सहायक कृषी अधिकारी, डिचोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT