Petrol pump Dainik Gomantak
गोवा

Goa: मोदी सरकारचा एक निर्णय आणि पेट्रोल पंप मालकांचे 6 कोटींचे नुकसान

गोव्यात (Goa) केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात केली आहे

दैनिक गोमन्तक

नरेंद्र मोदी सरकारने(Narendra Modi) देशभरातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा 3 नोव्हेंबर रोजी केली होती. केंद्र सरकारने डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर देशातील अनेक भाजपशासित राज्यांनीही त्यांच्या स्तरावर पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने इंधनावर आकारण्यात येणारा कर कमी केल्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.

गोव्यात (Goa) केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयानंतर गोव्यातील इंधन वितरकांचे सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पेट्रोल पंप विक्रेत्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ऑल गोवा पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष परेश जोशी (Paresh Joshi) म्हणाले की, राज्यातील सर्व 130 वितरकांचे सुमारे 6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दीपावलीपूर्वी पंपांना टाकी पूर्ण भरुन ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते

ते म्हणाले की पेट्रोलियम कंपन्यांनी वितरकांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या टाक्या भरलेल्या ठेवण्यास सांगितले आहे कारण पुढील दोन दिवस फिलिंग टर्मिनल बंद राहणार आहेत. जोशी म्हणाले, “जेव्हा वितरकांनी त्यांचा साठा मर्यादित ठेवला होता, तेव्हा अचानक केंद्राने आणि नंतर राज्य सरकारने किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती. यामुळे जुन्या दराने इंधन खरेदी करणाऱ्या वितरकांचे मोठे नुकसान झाले.”

केंद्राने 3 नोव्हेंबर रोजी उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आणि त्यानंतर गोवा सरकारने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 12 रुपये आणि डिझेलच्या दरात 17 रुपयांची घट झाली आहे. परेश जोशी म्हणाले की, बहुतेक वितरकांना त्यांच्या साठवण क्षमतेनुसार 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, जे सावरण्यासाठी त्यांना एक किंवा दीड महिना लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT