missing Dainik Gomantak
गोवा

Fatorda: 13 दिवस उलटले तरी बेपत्ता महिलेचा शोध नाहीच

शोध लागत नसल्याने डिसोझा यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा: कुंकळ्ळी येथील 59 वर्षीय महिला मागील 13 दिवसापूर्वी मडगाव परिसरातून बेपत्ता झाली. रोला डिसोझा असे नाव असलेल्या या महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही. मडगाव पोलिसांकडून रोला डिसोझा यांचा (Margao Police) शोध सुरु आहे. शोध लागत नसल्याने डिसोझा यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रोला डिसोझा मडगाव येथील ग्रेस चर्च परिसरात 09 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07 वाजण्याच्या सुमारास शेवटी दृष्टीस पडल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली.

बेपत्ता महिला तिचा पती जेरी आणि मुलगा क्लाईड यांच्यासह 9 सप्टेंबर रोजी मडगावला गेले होते. जेरी आणि क्लाइड पंप सेट खरेदी करण्यासाठी जात असताना, रोलाने ग्रेस चर्च, मडगाव येथे सोडण्यास सांगितले. रोलाने त्यांना सांगितले होते की ती चर्च मध्ये सामूहिक प्रार्थनेला हजेरी लावेल आणि बसने घरी परतेल. मात्र ती घरी न पोहोचल्याने तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक आणि मित्रांना फोन केला, मात्र त्यांचा शोध न लागला नाही. असे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

रोला डिसोझा शेवटी संध्याकाळी सातच्या सुमारास चर्च परिसरात पाहण्यात आल्या, याचे सीसीटीव्ही फुटेजही कुटुंबीयांना मिळाले आहे. मडगाव पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT