576 people have died due to corona so far
576 people have died due to corona so far 
गोवा

कोरोनामुळे आत्तापर्यंत 576 जणांचा बळी

गोमंतक वृत्तसेवा

पणजी: राज्यात आज आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची ५७६ वर येऊन पोहोचली आहे. आज दिवसभरात २११ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. राज्यात रुग्‍ण बरे होण्‍याची सरासरी ९२.५४ टक्के असून मृत्यूदरही कमी झाल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. आज दिवसभरात ६८ कोरोना रुग्णांनी होम आयसोलेशनची सुविधाही घेतली आहे, तर गेल्या चोवीस तासात ३२१ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

आज मृत्यू झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये नेवरा येथील ५९ वर्षीय पुरुष, म्हापसा येथील ७३ वर्षीय पुरुष, वाळपई येथील पुरुष, ७६ वर्षीय पुरुष, मांद्रे येथील ५० वर्षीय पुरुष, पणजी येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या दोन हजार आठशे चोवीस इतके सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील उपलब्ध खाटांची संख्या अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. उत्तर गोव्यात खाटांची संख्या ४६९ इतकी असून सध्या ३४७ खाटा वापरात आहेत तर दक्षिण गोव्यात ६९२ इतकी खाटांची संख्या असून सध्या ५६३ खाटा वापरात आहेत.

दरम्यान, डिचोली आरोग्य केंद्रात १२२, म्हापसा आरोग्य केंद्रात १११, पणजी आरोग्य केंद्रात ११३, चिंबल आरोग्य केंद्रात १५१, पर्वरी आरोग्य केंद्रात १८५, मडगाव आरोग्य केंद्रात २३२, कुडतरी आरोग्य केंद्रात ५२, फोंडा आरोग्य केंद्रात १३७ इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत. रविवारी दिवसभरात डिचोली विभागात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही. मये विभागात २, तर साखळी विभागात ५ मिळून तालुक्यात केवळ ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. रविवारी डिचोली विभागात ५४, मये विभागात ४३ आणि साखळी विभागात ६८ मिळून तालुक्यात एकूण १६५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT