Goa Latest Crime News Canva
गोवा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

Paroda Crime News: मोडेवाडो-पारोडा येथील उबालदिना ब्रागांझा या ५७ वर्षीय महिलेचा अज्ञाताने खून करून पळ काढला असून केपे पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

57 year old Woman Murdered in Paroda

केपे: मोडेवाडो-पारोडा येथील उबालदिना ब्रागांझा या ५७ वर्षीय महिलेचा अज्ञाताने खून करून पळ काढला असून केपे पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

आज केपे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. खुन्याचा माग घेण्यासाठी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते. सदर खुनाच्या दिवशी एक कामगार घराच्या आत होता, तसेच तिच्याकडे पैसे सुद्धा होते. सदर कामगाराने त्या पैशासाठी खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून केपे पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

पारोडा येथील उबालदिना हिच्या घराचे काम सुरू असून ती आपल्या मुलीकडे दुसऱ्या ठिकाणी राहात होती, पण घराचे काम पाहण्यासाठी ती रोज पारोडा येथे येत होती. २१ रोजी दुपारी १२.४५ वा. तिच्या मुलीने तिला अखेरचा फोन केला होता.

त्यानंतर दुपारी दोन वाजता घराचे टाईल्स बसविणार कामगार त्या ठिकाणी आला असता त्याला घराचा दार बंद असल्याचे दिसून आला. त्यानंतर त्याने तिला बाहेरूनच फोन केला असता फोन वाजत होता, पण फोन कोणीच उचलत नसल्याने त्याने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.

लोकांनी येऊन खिडकीतून पाहिले असता उबालदिना घराच्या शिडीवर पडून असल्याचे दिसून येतात. लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले असता तिला मृत घोषित केले. आज तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता हा खुनाचा प्रकार असल्याचे माहिती केपे पोलिसांना देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT