Mapusa Police Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: 55 जण ताब्यात; बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हापसा पोलिसांची विशेष मोहीम

Mapusa Police: म्हापसा पोलिसांची ‘स्पेशल नाईट ड्राइव्ह’ अंतर्गत विशेष कारवाई

Pramod Yadav

Mapusa Police

उत्तर गोव्यात अवैध पद्धतीने राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांची भाडेकरु पडताळणी पोलिसांच्या वतीने केली जात आहे. राज्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिस अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून, म्हापसा पोलिसांनी बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी शनिवारी रात्री विशेष मोहीम राबवली, या कारवाईत 55 जणांना ताब्यात घेतले.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तंबाखू उत्पादनांबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी COTPA कायद्यांतर्गत 17 गुन्हे दाखल केले.

यासह बेकायदेशीर कचरा डंपिंगप्रकरणी 13 गुन्हे दाखल करण्यात आले. तर, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल सहा ठिकाणी कारवाई केली. याव्यतिरिक्त, पोलिसांनी 127 भाडेकरुंची तपासणी केली. यावेळी दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम 34 अन्वये अटक करण्यात आली आणि कलम 151 अंतर्गत एकाला ताब्यात घेण्यात आले.

Mapusa Police

म्हापसा पोलिसांनी भाडेकरू पडताळणीसह विशेष गस्त मोहीम राबवली आहे, ज्याद्वारे विविध गुन्हे दाखल करण्यात आले. 1 जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारीची गेल्या वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास आमच्याकडे 2024 मध्ये 17 प्रकरणे कमी नोंदवली गेली आहेत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक (DySP) संदेश चोडणकर यांनी दिली.

Mapusa Police

गेल्या वर्षीच्या तुलनेत आमचा तपासाचा वेग 10 टक्क्यांनी वाढला आहे. या आकडेवारीमुळे म्हापसामधील गुन्ह्यांमधील घट आणि तपासदरांमध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात येते, असे चोडणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

SCROLL FOR NEXT