Holi 2024 Dainik Gomantak
गोवा

Holi 2024: ‘गोवन’ उद्योगात यंदा 500 किलो रंगनिर्मिती

Holi 2024: होळी आणि शिमगोत्सवात वापरण्यासाठी ‘गोवन’ या सरकारच्या प्रक्रिया उद्योगात पाचशे किलो नैसर्गिक रंगाचे उत्पादन यंदा घेतले जाणार आहे

दैनिक गोमन्तक

Holi 2024:

होळी आणि शिमगोत्सवात वापरण्यासाठी ‘गोवन’ या सरकारच्या प्रक्रिया उद्योगात पाचशे किलो नैसर्गिक रंगाचे उत्पादन यंदा घेतले जाणार आहे, अशी माहिती गोवा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांनी दिली.

पाळी येथे सरकारच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘गोवन’ या ब्रँडचा प्रक्रिया प्रकल्प आहे. तेथे पाचशे किलो नैसर्गिक रंगाचे उत्पादन यंदा केले जाणार आहे. त्याशिवाय राज्यभरातील अनेक महिलांना असे रंग तयार कसे करावेत, याचे मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले आहे. ज्ञानप्रसारक महाविद्यालयाचे विद्यार्थी यंदाही असे नैसर्गिक रंग तयार करणार आहेत.

नैसर्गिक रंग पुरेसे उपलब्ध होणार नसल्याने काही जणांना रासायनिक रंग यंदा वापरावे लागू शकतात. ज्यांना नैसर्गिक रंग मिळवून वापरणे शक्य आहे, त्यांनी नैसर्गिक रंगच वापरावेत म्हणजे प्रदूषण टाळता येईल तसेच आपले आरोग्यही राखता येईल, असे सरमोकादम यांनी सांगितले.

प्रदूषणविरहित रंग

गेल्या वर्षी ज्ञानप्रसारक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. फुले, हळद आदींच्या वापरातून नैसर्गिक रंगाची निर्मिती करता येते. हे रंग आरोग्यास हानिकारक नसतात तसेच ते प्रदूषणही करत नाहीत. सर्वांना पुरतील एवढ्या रंगांची निर्मिती आजच्या घडीला करणे शक्य नाही. मात्र, ज्या-ज्या लोकांना असे रंग वापरणे शक्य आहे त्यांनी ते वापरावेत, असे सरमोकादम यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT