Mapusa Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime News: धक्कादायक! बोटाच्या शस्त्रक्रियेवेळी सावर्डे येथील महिलेचा मृत्यु; डॉक्टरांची निष्काळजी?

मडगाव ईएसआय हॉस्पिटलमधील प्रकार

Rajat Sawant

Margao Crime News: राज्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका महिलेचा शस्त्रक्रियेवेळी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना मडगाव मधील एका रुग्णालयात घडली असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. तसेच मडगाव पोलिसांत तक्रारही नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार, सावर्डे येथील सुनयना सिमो देसाई वय 50 वर्षे या महिलेच्या एका हाताच्या बोटाला सूज आली होती. त्या बोटाला स्पर्श केला तरी तो स्पर्श जाणवत न्हवता. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मडगाव ईएसआय हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधला.

सुनयना यांना बुधवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान मडगाव येथील ईएसआय हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.

यावेळी अन्य रुग्णांवरही शस्त्रक्रिया होणार होती त्यामुळे त्यांनाही ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. यावेळी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास इतर रुग्णांना ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले.

मात्र सुनयना यांना ऑपरेशन थिएटरमध्येच ठेवण्यात आले. त्यामुळे तिचे कुटुंबीय अस्वस्थ झाले होते. यानंतर सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी सुनयनाला मृत्यू आल्याचे कुटुंबीयांना सांगितले.

यानंतर सुनयनाच्या कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टरांना मृत्युबाबत जाब विचारला. पण त्यावेळी डॉक्टरांनी योग्य असे स्पष्टिकरण दिले नाही. त्यामुळे सुनयना यांच्या कुटुंबियांनी मडगाव पोलिस स्टेशन गाठत डॉक्टरांच्या विरोधात त्यांनी शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला.

मडगाव पोलिसांनी शवचिकित्सा डॉक्टरांच्या पॅनेलमार्फत करावी अशी विनंती गोमॅकोचे डीन प्रो. डॉ. एस. एम बांदेकर यांना केली असून त्यांनी चार डॉक्टरांचे पॅनेल त्यासाठी निश्चित केले आहे. शवचिकित्सा अहलानंतर पोलिस पुढील कारवाई करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT