करमलघाटात धोकादायक वळणावर रस्ता रूंदीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिरिक्त पाच कोटी रूपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
करमल घाटातील धोकादायक वळणावर रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे ओएसडी अमोल बिरासदार पाटील यांना पाठवून करमलघाट रस्त्याची पहाणी केली. त्यावेळी सभापती रमेश तवडकर पत्रकारांशी बोलत होते.
नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, सहाय्यक अभियंता सागर शेट, निवृत्त सहाय्यक अभियंता सुभाष पागी,सभापतीचे स्वीय सचिव राजेंद्र बोरकर, माजी सरपंच गणेश वेळीप,पंच अक्षदा वेळीप, नीलेश गावकर,शंभा नाईक देसाई, सम्राट भगत यावेळी उपस्थित होते. तवडकर यांनी करमलघाट ते गुळे हा टापू धोकादायक बनला आहे, ही बाब गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
अपघात टाळण्यासाठी तातडीने कृती !
रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे, हे वास्तव लक्षात घेऊन तातडीने धोकादायक वळणे कापून त्याजागी रस्ता रुंदीकरण करण्यावर भर देण्यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.
त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली आहे, तिथे आठवड्यातून किमान तीन अपघात घडतात, हे निदर्शनास आणून दिल्यानंतर गडकरी यांनी त्वरित रस्ता रुंदीकरणासाठी तातडीने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे,असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.