Valpoi Record Surgery Dainik Gomantak
गोवा

माणुसकीला काळिमा! गाईच्या पोटातून निघाला 48 किलो प्लास्टिकचा डोंगर; वाळपईत 'रेकॉर्ड ब्रेक' शस्त्रक्रिया

Plastic Removed From Cow: गोव्यातील पिस्सुल्ये भागात एका १२ वर्षांच्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे तब्बल ४८.३ किलो प्लास्टिक आणि इतर कचरा बाहेर काढण्यात आला

Akshata Chhatre

वाळपई: गोव्यातील पिस्सुल्ये भागात एका १२ वर्षांच्या गाईच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे तब्बल ४८.३ किलो प्लास्टिक आणि इतर कचरा बाहेर काढण्यात आला. ही आतापर्यंतची गोव्यातील अशा प्रकारची सर्वाधिक कचरा काढण्याची पहिलीच घटना मानली जात आहे. मानवाच्या बेजबाबदारपणामुळे मुक्या प्राण्यांना किती भयानक यातना सहन कराव्या लागतात, याचे हे जिवंत आणि धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

मुदतपूर्व प्रसूती आणि बिघडलेली प्रकृती

ही घटना २२ डिसेंबर २०२५ रोजी समोर आली. पिसुर्ले येथील एका १२ वर्षांच्या गाईने मुदतपूर्व वासराला जन्म दिला होता. मात्र, प्रसूतीनंतर गाईची प्रकृती अत्यंत खालावली. ती जमिनीवर पडून होती, तिला उभे राहता येत नव्हते आणि लघवी करताना तिला प्रचंड त्रास होत होता.

गाय सतत विव्हळत असल्याने तातडीने पशुवैद्यकीय मदतीसाठी पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीत गाईच्या पोटात मोठ्या प्रमाणात विजातीय पदार्थ (Foreign materials) असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

तातडीची शस्त्रक्रिया आणि धक्कादायक वास्तव

गाईची गंभीर अवस्था पाहून तिला वाळपई येथील 'अखिल विश्व गोसंवर्धन केंद्र' (नाणुस) येथे हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तातडीने 'रुमिनोटॉमी' ही आणीबाणीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया सुरू झाल्यावर डॉक्टरांना जे दिसले, ते पाहून त्यांचेही डोळे पाणावले.

गाईच्या पोटात चक्क ४८.३ किलो कचरा साठलेला होता. यामध्ये केवळ प्लास्टिक पिशव्याच नव्हत्या, तर पीव्हीसी पाईपचे तुकडे, चामड्याचा बेल्ट, जुने रेनकोट, कापडाचे तुकडे, नायलॉनच्या दोऱ्या आणि चक्क बांधकामासाठी वापरली जाणारी मेटल वायर देखील आढळली.

पर्यावरणासाठी धोक्याची घंटा

या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गाईचा जीव वाचला असला, तरी या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ४८ किलोपेक्षा जास्त प्लास्टिक पोटात असूनही ती गाय इतके दिवस जगली कशी, हाच एक मोठा चमत्कार मानला जातोय. "आम्ही आजवर अनेक शस्त्रक्रिया केल्या, पण एका गाईच्या पोटातून इतका मोठा कचरा बाहेर येण्याची ही पहिलीच वेळ आहे," असे डॉक्टरांनी सांगितले. हा प्रकार म्हणजे आपण रस्त्यावर फेकत असलेल्या कचऱ्याचा भयानक परिणाम आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT