Goa Dairy Election Dainik Gomantak
गोवा

गोवा डेअरीच्या निवडणुकीसाठी 43 अर्ज दाखल

6, 7 जूनला उमेदवारी मागे घेण्यासाठी मुभा, 19 जूनला होणार मतदान

दैनिक गोमन्तक

Goa Dairy Election : राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज देण्याच्या शेवटच्या दिवशी सात उमेदवारी अर्जांसह एकूण 43 उमेदवारी अर्ज दाखल झाले. गोवा डेअरीच्या बारा संचालक मंडळासाठी ही निवडणूक येत्या 19 जूनला होणार आहे. येत्या 6 व 7जूनला उमेदवारी मागे घेण्याचा दिवस असल्याने त्यादिवशीच उमेदवारांची संख्या निश्‍चित होणार आहे.

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या 107 मध्ये झाली होती, ती आता यंदा 2022 मध्ये पाच वर्षांनी होत आहे. बारा संचालकांची निवड दूध सोसायट्यांतर्फे होणार असून तीन संचालकांची सरकार नियुक्ती करणार आहे, त्यामुळे संचालक मंडळाचा आकडा पंधरावर जाणार आहे.

सद्यस्थितीत उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांत माजी अध्यक्षांसह माजी संचालक व काही नवीन उमेदवारांचा समावेश आहे. मागच्या काळात प्रशासकीय समितीचे अध्यक्ष असलेल्या दुर्गेश शिरोडकर यांचेही नाव उमेदवारीत आहे.

उमेदवारी दाखल केलेल्या 43 जणांतील किती उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहतात ते येत्या 6 व 7 जूनला निश्‍चित होणार आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी मंगळवारी 31 रोजी होणार आहे.

दरम्यान, गोवा डेअरीचा मागच्या 2017 च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर बहुतांश काळ हा प्रशासकीय समितीकडे राहिला आहे. निवडून आलेल्या काही संचालकांना न्यायालयाचा दणका बसल्याने संचालक मंडळ अधिकारावर राहिले नाही, त्यामुळेच सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडे गोवा डेअरीचा ताबा राहिला. त्यामुळे आता येत्या 20 तारखेला मतमोजणीनंतर गोवा डेअरीचा नव्याने निवडून दिलेल्या संचालकांकडे ताबा राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT