Karwar Bridge Collapses  Dainik Gomantak
गोवा

Bridge Collapses Near Karwar: मडगाव-मंगळूरला जोडणारा ४१ वर्षीय जुना पूल कोसळला

Maragao Mangaluru Road Bridge Collapsed: जुना पूल कोसळल्यामुळे आता पूलावरून एकेरी वाहतूक होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

कारवार येथील मडगाव -मंगळूरला जोडणाऱ्या हमरस्ता क्रमांक ४ काळी नदीवरील ४१ वर्षीय जुना पूल मंगळवारी मध्यरात्री कोसळला.१९८३ मध्ये काळी नदीवर हा पूल उभारण्यात आला होता.त्यापूर्वी नदी पात्र ओलांडण्यासाठी बोटीचा(वखार) वापर करण्यात येत होता.सदाशिवगड बाजूकडील पूलाचा एक स्लॅब मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोसळला.

गोव्यातून कारवारच्या दिशेने जाणारा एक तामिळनाडू येथील मालवाहू ट्रक कोसळलेल्या स्लॅब बरोबर नदीच्या पात्रात कोसळला ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकच्या बाहेर येऊन ट्रकच्या टोपवर चढून आपला जीव वाचविला.नंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप नदीच्या पात्राबाहेर काढले.

हा पूल कमकुवत झाल्याने पांच वर्षांपूर्वी या पूलाला समांतर पूल उभारण्यात आला होता त्यामुळे दुहेरी वाहतूक सोयीची झाली होती मात्र जुना पूल कोसळल्यामुळे आता पूलावरून एकेरी वाहतूक होणार आहे.काणकोण मधील रहिवासी व्यापार व मासे खरेदीसाठी कारवारला जात असतात.मात्र पूल कोसळल्यामुळे त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.रात्री अकरा- बारा वाजेपर्यंत गोव्यातून मंगळूर, बंगळूर जाणाऱ्या आंतरराज्य प्रवासी गाड्या या पूलावरून कारवारच्या दिशेने जात असतात.पूल कोसळल्यामुळे कारवार हून गोव्यात येणाऱ्या प्रवासी गाड्यावर निर्बंध आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT