4 kg cannabis seized with two weapon, youth arrested in Margao  Dainik Gomantak
गोवा

दोन पिस्तुलांसह 4 किलो गांजा जप्त, मडगावमध्ये तरूणाला अटक

4 किलो गांजा जप्त, दोन पिस्तुलांसह काडतुसेही जप्त

दैनिक गोमन्तक

मडगाव : मनमाडहुन 4.3 किलो गांजा घेऊन निझामुद्दीन एक्सप्रेस मधून गोव्यात आलेल्या थनाराम या राजस्थान येथील संशयिताला आज रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या मदतीने अटक केली. या मालाची किंमत 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून गोव्यात (goa) हा गांजा विकण्यासाठी तो घेऊन आला होता असे सांगितले गेले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून मडगाव (margao) रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली. (Goa Crime News updates)

त्याची झडती घेतली असता ताच्याकडे दोन पिस्तुले आणि 18 काडतुसेही सापडली. हा सारा माल जप्त करून नंतर त्याला अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या तरुणासोबत संशयास्पद घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा तरुण गोव्यात फिरण्यासाठी आला होता. मात्र अचानक बेपत्ताही झाला होता. जेव्हा हा तरुण तेलंगणातील आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या अंगावर संशयास्पद खुणा सापडल्याचं बोललं जात आहे.

हैदराबादचा (Hyderabad) हा तरुण मार्चमध्ये काही लोकांसोबत पर्यटनासाठी गोव्यात आला होता. मात्र अचानक बेपत्ताही झाला होता. तरुण बेपत्ता झाल्याचं पाहून त्याच्या कुटुंबीयांनी गोवा गाठलं आणि तरुणाचा शोध घेतला होता. मात्र खूप शोधूनही तरुण न सापडल्याने कुटुंबीयांनी हणजूण पोलीस (Police) स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT