mobile tower 4G in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 39 गावे अद्यापही 4-जी नेटवर्क सेवेपासून वंचित!

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाची धक्कादायक माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात विविध ठिकाणी मोबाईल टॉवर उभारणीस लोक विरोध करीत आहेत. एका बाजूला टॉवरला विरोध होत आहे, तर दुसरीकडे मोबाईल सेवा नसल्याच्या तक्रारीही लोक करीत आहेत. मोबाईलधारकांना आता फाईव्ह-जी (5-जी) सेवेची उत्सुकता आहे. परंतु अद्याप राज्यातील 39 गावांमध्ये फोर-जी सेवाही उपलब्ध नाही. ही धक्कादायक माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने दिली आहे.

उत्तर गोव्यात 14 गावांमध्ये, तर दक्षिण गोव्यात 25 गावांमध्ये फोर-जी सेवा उपलब्ध नसल्याचे दूरसंचार मंत्रालयाच्या अहवालात नमूद केले आहे. मोबाईल इंटरनेटमध्ये सध्या फोर-जी सेवा कार्यान्वित आहे. फाईव्ह-जीचे मोबाईल बाजारात आले असले तरी ही सेवा राज्यात काही ठिकाणीच सुरू आहे. फोर-जी इंटरनेट सेवेतही चांगल्यापैकी नेटवर्कची गती मिळत आहे. तीसुद्धा 39 गावांपर्यंत पोहोचलेली नाही.

फोर-जी सेवा न पोहचलेली गावे

उत्तर गोवा : सत्तरी, खोतोडे, करंझोळ, कोडवाळ, उस्ते, सुर्ला, गोल्याळी, मेळावली, मालपण, असोदे, सिरांगुळी, पेंद्राळ, झरणी, पणसुले, डिचोली- हरवळे,

दक्षिण गोवा : धारबांदोडा- सोनावली, सुर्ला, काणकोण-खोतीगाव, सांगे-वेर्ले, नुन्दे, नेत्रावळी, विचुंद्रे, कुर्पे, कुर्डी, पोर्टी, नैकनी, बाती, पोट्रे, तोडू, म्हाऊळगी, पाते, मांगल, काझूर, कोर्ला, सुकळर्णे, कुसकोंडा, गोकुल्डे, कावरे, साकोर्डे, डोंगुर्ली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT