37th National Games Logo launched  Dainik Gomantak
गोवा

37th National Games in Goa : 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या लोगोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान राज्यात राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

Rajat Sawant

ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या लोगोचे अनावरण आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामानिक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आयओए’चे सहसचिव कल्याण चौबे उपस्थित होते.

37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "गोव्यातील राष्ट्रीय खेळांचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या यजमानपदासाठी गोवा सज्ज आहे."

"37 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येकाच्या लक्षात राहील अशा पद्धतीने गोवा सरकार करेल. गोव्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाला सरकार पाठिंबा देईल." असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षा पी. टी. उषा गोवा दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी "स्पर्धेसाठीच्या साधनसुविधा आणि इतर तयारीवर आम्ही समाधानी आहोत", असे मत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते.

37 व्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT