37th National Games  Dainik Gomantak
गोवा

37th National Games : फोंड्यात वरुणराजा कोपणार? मैदान खराब होऊ नये यासाठी खबरदारी

क्रीडामंत्र्यांनी फोंडा क्रीड संकुला, तसेच तिरंदाजी स्पर्धेचे केंद्र असलेल्या फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी मैदान परिसराची पाहणी केली

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games : पणजी, गोव्यात सध्या पडणाऱ्या परतीच्या पावसाचे सावट ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर आहे.

पावसाचा फटका बाह्य मैदानावरील (आऊटडोअर) खेळांवर होण्याची शक्यता आहे, मात्र अशा स्पर्धास्थळी चिखल होणार नाही किंवा जागा खराब होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी दिली.

क्रीडामंत्र्यांनी फोंडा क्रीड संकुला, तसेच तिरंदाजी स्पर्धेचे केंद्र असलेल्या फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी मैदान परिसराची पाहणी केली. फोंड्यातील आऊटडोअर खेळांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

फर्मागुढी येथील पाहणीनंतर क्रीडामंत्री म्हणाले, की ‘‘त्रुटी राहू नयेत यासाठी आम्ही ही पाहणी केली. २९ ऑक्टोबर रोजी तिरंदाजी स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत.

हा खुल्या मैदानातील खेळ असून अलीकडे काही पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पार्किंग, प्रसाधनगृह कक्ष, महनीय व्यक्तींचे कक्ष, क्रीडापटूंचे कक्ष, जर्मन हँगर्स तज्ञत्रानाचे तंबू आदींची तयारी करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण होईल.

येथील स्पर्धा केंद्रांची अगोदर तालीम घेणार असून, कोणतीही अडचण दूर करण्यास ४८ तास मिळतील. पाऊस पडला तरी या ठिकाणी चिखल होणार नाही अथवा जागा खराब होणार नाही, याची दक्षता आम्ही घेणार आहोत.’’

खो-खो स्पर्धा फोंड्यातील क्रीडा संकुलात होणार आहे. खो-खो स्पर्धा आऊटडोअर आहे. याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना असेल, तसेच आच्छादनही उपलब्ध केले जाईल, असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

२९ ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत खो-खो स्पर्धा खेळली जाईल. याशिवाय मॉडर्न पेंटॅथलॉन आणि तायक्वांदो हे खेळही फोंडा क्रीडा संकुलात होतील.

या ठिकाणच्या सर्व पायाभूत सुविधा स्पर्धा सुरू होण्यास ४८ तास अगोदर सुसज्ज असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खुल्या जागेतील खेळ आसन व्यवस्थेविना

तिरंदाजीसारखे खेळ खुल्या मैदानावर होत असल्याने याठिकाणी प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेवर निर्बंध नसेल, असे क्रीडामंत्री गावडे यांनी स्पष्ट केले. खुल्या मैदानावरील स्पर्धांसाठी काही जागा विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल.

मात्र इतर प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था नसेल. कितीही प्रेक्षक या खेळांचा आनंद लुटू शकतील, असे क्रीडामंत्री म्हणाले.

फोंड्यातील इनडोअर क्रीडा संकुलात एकूण आसनव्यवस्था ४५० जणांची असेल, त्यापैकी ५० टक्के आसने विद्यार्थ्यांसाठी, २० टक्के आसने क्रीडापटू व तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी आरक्षित असतील, असे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

खो-खो इनडोअर मैदानात? : जोरदार पावसामुळे खो-खो मैदान खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे आम्ही पर्यायी विचार करत आहोत, असे क्रीडामंत्री गावडे म्हणाले.

पारंपरिक पद्धतीने खो-खो स्पर्धा खुल्या मैदानात घेण्याचे ठरले आहे, मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास उभारलेल्या तंबूत (इनडोअर) स्पर्धा घेण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे क्रीडामंत्र्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT