GST  Dainik Gomantak
गोवा

Goa GST : गोव्याला जीएसटीची 376 कोटींची भरपाई

ऑगस्ट 2021 च्या तुलनेत यावर्षीच्या ऑगस्टची भरपाई ही 32 टक्क्यांनी जास्त आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa GST : गोव्याला केंद्र सरकारच्या अर्थखात्याकडून वस्तू सेवा करापोटी (जीएसटी) ऑगस्ट 2022 ची भरपाई म्हणून 376 कोटी रुपये मिळाले आहेत. ऑगस्ट 2021 च्या तुलनेत यावर्षीच्या ऑगस्टची भरपाई ही 32 टक्क्यांनी जास्त आहे. ऑगस्ट 2022 मध्ये देशभरातून जीएसटी महसूल 1 लाख 43 हजार 612 कोटी रुपये आहे. ज्यापैकी सीजीएसटी 24 हजार 710 कोटी आहे. एसजीएसटी 30 हजार 951 कोटी आणि आयजीएसटी 77 हजार 782 कोटी रुपये आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाने ऑगस्टमध्ये वार्षिक 28 टक्के वाढ नोंदवत 1.44 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जीएसटी परिषदेने राबवलेल्या केलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम आहे. अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याने जीएसटी महसुलावरही सकारात्मक परिणाम होत आहे, असेही वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

यंदाच्या जुलैमध्ये जमा झालेल्या 1.49 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ऑगस्टमधील करसंकलन चार टक्के कमी आहे. सर्वाधिक विक्रमी करसंकलन एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी रुपये झाले होते. ऑगस्ट 2021 मधील 1,12,020 लाख कोटी संकलनापेक्षा या ऑगस्टमध्ये 28 टक्के अधिक करसंकलन झाले आहे, असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ऑगस्टमधील जीएसटी संकलन 1.44 लाख कोटी रुपये झाले असून हे संकलन 1.40 कोटींपेक्षा जास्त असण्याची ही सलग सहावी वेळ आहे. अर्थात जुलैपेक्षा ही रक्कम चार टक्के कमी झाली आहे. एप्रिलपासून आतापर्यंत वस्तू व सेवा कराचे 7.46 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT