coronavirus 
गोवा

चोवीस तासांत ३४८ पॉझिटिव्‍ह

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. मागील २४ तासांत आतापर्यंत सर्वाधिक ३४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच चार कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड मृतांची संख्या ६४ पर्यंत पोहोचली आहे. गोवा आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २०७२ एवढे कोरोनाबाधित रुग्‍ण आहेत.

दरम्यान, ज्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्यामध्ये खांडोळा - माशेल येथील ७१ वर्षीय महिला, फर्मागुडी फोंडा येथील ६३ वर्षीय पुरुष, डिचोली येथील ६५ वर्षीय पुरुष, पर्वरी येथील ७९ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला. पर्वरी येथील महिलेचा मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात झालेला असून बाकीच्या तिघांचा मृत्यू कोविड इस्पितळात झाला आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ७२ जणांना ठेवण्यात आले. १९९१ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर १८११ जणांचे अहवाल देण्‍यात आले आहेत. दरम्यान, रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १३ रुग्ण आहेत.

डिचोली आरोग्य केंद्रात १२ रुग्ण, साखळी आरोग्य केंद्रात ६३ रुग्ण, पेडणे आरोग्य केंद्रात ३६ रुग्ण, वाळपई आरोग्य केंद्रात ६७ रुग्ण, म्हापसा आरोग्य केंद्रात ६८ रुग्ण, पणजी आरोग्य केंद्रात ८५ रुग्ण, बेतकी आरोग्य केंद्रात १७ रुग्ण, कांदोळी आरोग्य केंद्रात ५५ रुग्ण, कोलवाळ आरोग्य केंद्रात ४२ रुग्ण, खोर्ली आरोग्य केंद्रात ४३ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्रात ९० रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्रात ५३ रुग्ण, कुडचडे आरोग्य केंद्रात ३१ रुग्ण, काणकोण आरोग्य केंद्रात १४ रुग्ण, मडगाव आरोग्य केंद्रात १३६ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ३९८ रुग्ण, लोटली आरोग्य केंद्रात ३४ रुग्ण, मेरशी आरोग्य केंद्रात २८ रुग्ण, केपे आरोग्य केंद्रात ३७ रुग्ण, शिरोडा आरोग्य केंद्रात ४१ रुग्ण, धारबांदोडा आरोग्य केंद्रात ३५ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्रात १२५ रुग्ण आणि नावेली आरोग्य केंद्रात ४६ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway Bike Racing: सुसाट वेग, मॉडिफाईड बाईक्स अन् थरारक स्टंट्स; हायवेवर जीवघेणी बाईक रेसिंग करणाऱ्या दोघांना अटक, म्हापसा पोलिसांची कारवाई

Deepak Chahar Chit Celebration: विकेट घेतली, खिशात हात टाकला अन्... दीपक चहरने उडवली 'चिट सेलिब्रेशन'ची खिल्ली Video Viral

Horoscope: गुरुवारी बनतोय शुभ योग; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, सर्व चिंता मिटणार; करिअरमध्ये मिळणार प्रगतीच्या नव्या संधी

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT