Russian Tourist Arrived On Dabolim Airport 
गोवा

Russian in Goa: रशियन आले हो! हंगामाच्या पहिल्या चार्टरने 334 पर्यटक गोव्यात दाखल

Russian Tourist Arrived In Goa: रशियातील नुकोव्हो येथून उड्डाण घेतलेले विमान मंगळवारी पहाटे चार वाजता दाबोळीवर उतरले.

Pramod Yadav

दाबोळी: गोव्याचा पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. देश - विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत युनाटेड किंगडम, रशिया, उझबेकिस्तान यासह विविध देशातील पर्यटक गोव्यात दाखल झालेत.

रशियातून ३३४ पर्यटकांना घेऊन हंगामातील पहिले चार्टर मंगळवारी (०५ नोव्हेंबर) दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

रशियातून अजुर एअरची फ्लाईट गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाली. रशियातील नुकोव्हो येथून उड्डाण घेतलेले विमान मंगळवारी पहाटे चार वाजता दाबोळीवर उतरले.

मिळालेल्या माहितीनुसार अजुर एअर यावर्षी रशियातून ११० फ्लाईट्स ऑपरेट करणार आहे. यानंतर येत्या १५ आणि २६ नोव्हेंबर रोजी रशियातून दोन चार्टर गोव्यात येणार आहेत. तसेच, डिसेंबर ते मार्च या कालावधीत काही चार्टर गोव्यात येणार असल्याची माहिती आहे.

एक दिवसापूर्वी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायडेट किंगडम येथून २९२ पर्यटकांना घेऊन चार्टर विमान दाखल झाले. विमानतळावर पर्यटकांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

उझबेकिस्तान येथून गोव्यासाठी थेट फ्लाईट सुरु करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ताश्कंद येथून पर्यटकांना घेऊन फ्लाईट मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT