Goa Congress Dainik gomantak
गोवा

AICC चे नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी 31 PCC प्रतिनिधी गोव्यात करणार मतदान

गोव्यात आज सकाळी 10 वाजल्यापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: गोव्यात आज सकाळी 10 वाजल्यापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. गोव्यातील 31 प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) प्रतिनिधी निवडणुकीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

(31 PCC delegates to cast their vote in Goa to elect new AICC president)

ही निवडणूक दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार असुन. 24 वर्षांनंतर काँग्रेस बिगर गांधी अध्यक्ष निवडणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यातच लढत आहे. इलेक्टोरल कॉलेजमधून देशभरातील 9,000 हून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) प्रतिनिधी गुप्त मतपत्रिकेद्वारे पक्षप्रमुखाची निवड करतील.

देशातील सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान (Congress President Polls) होत आहे. अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीकडे (Congress President Election) सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात पक्षाध्यक्षपदाचा सामना रंगणार आहे. दिल्लीतील असलेले पक्षाचे मुख्यालयात आणि देशभरातील 65 हून अधिक केंद्रांवर आज मतदान होणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.

137 वर्षांच्या इतिहासात आज सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी मतदान

काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात आज सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. 24 वर्षानंतर नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणीतरी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. आजच्या मतदानात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह तसेच, अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील मदतान केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT