Dainik Gomantak
Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांची अनोखी परंपरा ; म्हामाई कामतांच्या निवासस्थानी अनंत पूजन थाटात

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi 2023 : पणजी अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना गोव्यातील मोजक्याच घराण्यांमध्ये भगवान विष्णूचे रूप असणाऱ्या अनंताची पूजा केली जाते. त्याप्रमाणे आज जुन्या सचिवालयाशेजारील म्हामाई कामत यांच्या पोर्तुगीजकालीन निवासस्थानी अनंत पूजन झाले.

अनंत चतुर्दशीला अनंताची पूजा करण्याची जुनी परंपरा असून या दिवशी पहाटेपासून या पूजेच्या तयारीला सुरुवात होते. आणि दुपारी महाआरती आणि महाप्रसाद दिला जातो.

या महोत्सवाची तयारी म्हामाई कामतांचे कुटुंबीय आठवडाभरापासून करतात. या जुन्या पोर्तुगीजकालीन घरात अनंत पूजनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आजही कायम आहे.परंपरागत यथासांग अनंत पूजा

यजमान शंकर म्हामाई कामत यांनी आज अनंताची यथासांग पूजा केली. त्यानंतर नागरिकांनी देवदर्शनसाठी मोठी गर्दी केली होती.

हा पवित्र योग वर्षभरातून केवळ एकदा येत असल्याने तो महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आजही नागरिकांनी देवदर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT