Ganesha temple at Vantem Dainik Gomantak
गोवा

300 वर्षांची परंपरा सांगणारे वांते येथील गणेश मंदिर

300 वर्षापूर्वीची देखणी मुर्ती ठरते आहे भक्तांचे आकर्षण

दैनिक गोमन्तक

वाळपई: निसर्ग संपन्न सत्तरी ही चारी बाजुनी हिरवा शालू नेसून नटलेली आहे. तालुक्यात कित्येक पुरातन मंदिरे आहेत यापैकी एक मंदिर म्हणजे वांते येथील श्री गणपती मंदिर. हे मंदिर आता चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची रिघ सुरु झाली आहे. यामूळे परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

(300 year old Ganesha temple at Vantem)

वांते येथील गणेश मंदिरांच्या इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास या मंदिराची उभारणी वांते येथील जोशी कुटुंबीयांच्या पुर्वजांनी सुमारे तीनशे वर्षापूर्वी केली आहे. एका तळ्याच्या बाजुला दगडावर कोरीव काम करुन ही 300 वर्षापूर्वी मुर्ती तयार केली गेली. ही मुर्ती आज ही इतकी आकर्षक व मजबुत आहे की भाविकांना या मंदिराला 300 वर्षांचा इतिहास असल्याने आश्चर्य वाटते. गणपतीच्या बाजूला उभा मारुतीची मुर्ती कोरलेली आहे.

या मंदिराच्या उभारणीसाठी ही 300 वर्षापूर्वी 300 रुपये खर्च आल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला श्रीचे मंदिर उभारण्यात आले काही वर्षानंतरवरच्या बाजूला श्री दत्त मंदिर उभारले गेले. त्या काळी मंदिराची उभारणी योग्य पध्दतीने निर्सगाच्या सानिध्यात केली गेली आहे. गणपती मंदिराच्या बाजुने 12 माहिने एक झरा वाहतो व आजुबाजूला बागायती. ही मन प्रसन्न करते. हे मंदिर जतन करण्यासाठी जोशी कुटुंब आपली परंपरा जोपासत आहे. देवाची नित्त्य पुर्जा अर्चा केली जाते. या कुटुंबाच्या 12 पिढ्या याचा वारसा सांभाळत आहे.

पाण्यात पणती व सोडत फेडले जातात नवस

दर दिवशी शेकडो भाविक ह्मा पुरातन मंदिराला भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धा स्थान असुन भाविकांच्या मनोकामना पुर्ण होतात. अशी नागरिकांची श्रद्धा आहे. दर वर्षी दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेला नवस फेडण्याची मुभा असते. ती म्हणजे पौर्णिमेदिवशी मंदिरांकडे असलेल्या पाण्यात पणती व सोडवण्याची. यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात भेट देऊन नवस फेडतात. सुमारे 3 ते 4 हजारच्यावर पणत्या नवस स्वरुपात सोडल्या जातात.

यावेळी बोलताना प्रमोद रामचंद्र जोशी म्हणाले जोशी कुटुंबिय पूर्वजांचा वारसा पुढे नेत आहे. मंदिर जुने असले तरी भक्कम आहे. मात्र 1965 साली जेव्हा भुकंप झाला त्यावेळी मंदिर हादरले. मंदिराच्या बाजुला असलेले काही बांधकाम कोसळले. आम्ही जोशी कुटुंबानी काही प्रमाणात मंदिराची डागडुजी केली आहे असे ही ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT