Goa Live Updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर यांना राज्य सन्मान देण्यात सरकार अपयशी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी. राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर बातम्या

Sameer Amunekar

Goa Accident: बायणा अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कुडतरीमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात काल संध्याकाळी घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी बायणा येथे झालेल्या अपघातात कुडतरी येथील ४३ वर्षीय कुलासो यांचा मृत्यू झाला.

Mayem: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

मये येथे ‘उडाना’ रेल्वेच्या धडकेने एक रेडा ठार झाला. कोकण रेल्वे पोलिसांनी मागाहून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पशुचिकित्सकाकडून मृत रेड्याची चिकित्सा करून नंतर विल्हेवाटीसाठी मये पंचायतीच्या ताब्यात देण्यात आला.

Goa Crime: गिरदोली चांदर येथे 36 वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेत संपवलं जीवन

गिरदोली चांदर येथे एका ३६ वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. महेश नाईक असे मयताचे नाव असून, तो मूळ कारवार जिल्ह्यातील हुळगा येथील असल्याची माहिती मायणा कुडतरी पोलिसांनी दिली. अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनेची नोंदवून करण्यात आली आहे.

Bicholim: इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

डिचोलीच्या भर बाजारात एका इमारतीत दिवसाढवळ्या संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका युवकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी लोकांनी या युवकाची यथेच्छ धुलाई केल्याची माहिती मिळाली आहे.

हा युवक एका इमारतीची गेट तोडत होता. त्यावेळी त्याला रंगेहाथ पकडल्याने तो चोरी करण्याच्या उद्देशाने आला असावा, असा संशय वर्तविण्यात येत आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. हा युवक परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे.

Morjim: चार लमाणी महिला पोलिसांच्या ताब्यात

पर्यटकांना अडथळे निर्माण केल्याप्रकरणी कपडे विकणाऱ्या चार लमाणी महिलांना पर्यटक खात्याचे निरीक्षक जतिन पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली यतीन शेट्ये व अँथनी मॉन्टेरो यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५ (३) गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सुरू आहेत.

Khorlim: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

खोर्ली यंथील पीडीए कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शुक्रवार ३१ रोजी सायंकाळी ६.३० वा. गोवा आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

४५५.५ कोटी रुपयांचा दाभोळी-वेर्णा उड्डाणपूल प्रकल्प

४५५.५ कोटी रुपयांचा दाभोळी-वेर्णा उड्डाणपूल प्रकल्प. काँग्रेसकडून एसआयटी चौकशीची मागणी; एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीकडून निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप

स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर यांचे निधन

स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर (वय ८७) यांचे गुरुवारी सकाळी मडगाव येथे निधन झाले. त्यांनी १९५५ च्या मापुसा सत्याग्रहात भाग घेतला होता.

7 महिन्यांनंतर दोना पावला दरोडा प्रकरणात पहिली अटक

एप्रिल २०२५ च्या दोना पावला दरोडा प्रकरणात पणजी पोलिसांनी महमूद अली (४६), रहिवासी, कलंगुट, मूळ उत्तर प्रदेश, याला अटक केली आहे. महमूद अली याचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याला जेएमएफसी पणजीने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बेतीच्या रस्त्यांवर रंगीत गाडी, नंबर प्लेट नसतानाही मुक्तपणे फिरतेय; Watch Video

डॉ. प्रमोद सावंत यांची विरोधकांवर टीका!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, 'म्हजे घर योजने'वर टीका करणारे नेतेच आता लोकांना अर्ज करण्यास मदत करण्यासाठी त्याचे फॉर्म वापरत आहेत.

"उगवे, पेडणेमध्ये झालेल्या गोळीबाराची चौकशी सुरू" मुख्यमंत्री

वाळू उपशावरून उगवे, पेडणेमध्ये झालेल्या गोळीबाराची संपूर्ण चौकशी सुरू: मुख्यमंत्री सावंत

स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर यांना राज्य सन्मान देण्यात सरकार अपयशी

१८ जून क्रांती दिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सरकारच्या उदासीनतेबद्दल तीव्र निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की सरकारने त्यांच्या बलिदानाचा योग्य आदर आणि ओळख द्यावी, विशेषतः त्यांच्या निधनाच्या वेळी. शिरोडकर यांनी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर यांना राज्य सन्मान देण्यात अपयशी ठरल्याबद्दल सरकारवर टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतीय तटरक्षक दलाला सलाम...! अरबी समुद्रात बहादुरी गाजवत ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले; गोव्यात यशस्वी उपचार VIDEO

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

SCROLL FOR NEXT