Mobile Phone Found In Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ कारागृहात पुन्हा सापडले मोबाईल फोन्स; टोळीयुद्धानंतर तुरूंग महानिरीक्षकांची तपासणी

बिश्नोई यांनी कोलवाळ कारागृहात आज केलेल्या तपासणीत पुन्हा मोबाईल फोन सापडले आहेत.

Pramod Yadav

Colvale Jail: कोलवाळ कारागृह नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. कारागृहात 31 मे राजी टारझन व कार्बोटकर या कैद्यांच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून राडा झाला. यानंतर तुरुंगातील या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. 

यापूर्वी कारागृहात तुरूंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी अचानक तपासणी केली असता, मोबाईल फोन्स, ब्लुटुथ हेडसेट, इंडक्शन कुकटॉप, अमली पदार्थ, तंबाखू असे साहित्य या आढळून आले. दरम्यान, बिश्नोई यांनी आज केलेल्या तपासणीत पुन्हा मोबाईल फोन सापडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तुरूंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी आज अचानक कोलवाळ कारागृहाची तपासणी केली. यात तीस मोबाईल फोन्स कारागृहातून जप्त करण्यात आले. याशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तंबाखू असे साहित्य या आढळून आले आहे.

दोन दिवसांपूर्वी भडकले टोळीयुद्ध

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात 31 मे रोजी सकाळी पुन्हा टारझन व कार्बोटकर या कैद्यांच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून राडा झाला. यावेळी तुरुंगाधिकारी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण चिघळले नाही.  कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी या घटनेचा अहवाल तुरुंग अधीक्षकांकडून मागविला आहे.

मार्चमध्ये महिन्यात दोन कारवाईत मोबाईल फोन जप्त

तुरूंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यात दोनवेळा कोलवाळ कारागृहात आकस्मिकपणे तपासणी करण्यात आली. सुरूवातीला घातलेल्या छाप्यात 45 मोबाईल्स, चार्जर आणि ड्रग्ज गेल्या महिन्यात सापडले तर, त्यानंतर केलेल्या तपासणीत कैद्यांकडून 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

दरम्यान, आज पुन्हा केलेल्या तपासणीत तीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT