Ponda Police Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गाडी अंगावरून जाण्यापूर्वीच झाला होता मृत्यू

Goa Accident Case: कन्हैयाकुमार मोंडल मृत्यू प्रकरण; तीन पोलिस निलंबित

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा येथील कन्हैयाकुमार मोंडल मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा दाखविल्याचा ठपका ठेवून गुरुवारी रात्री उशिरा फोंडा पोलिस स्थानकातील तीन पोलिसांना निलंबित करण्याचा आदेश दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी जारी केला.

या प्रकरणात हवालदार रवींद्र नाईक, रॉबर्ट व्हॅनवरील पोलिस शिपाई आश्विन सावंत आणि प्रीतेश प्रभू यांचा समावेश आहे. कन्हैयाकुमारला फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट व्हॅनने लोटली येथे आणून सोडले होते. त्यानंतर त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता.

लोटली येथे ‘हिट ॲण्ड रन’ अपघातात मरण पावलेल्या कन्हैयाकुमार या बिहारी इसमाचा मृत्यू अंगावरून गाडी गेल्याने झाला नसून त्यापूर्वीच त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने जखमा झाल्या होत्या, त्यामुळे झाल्याचे उत्तरीय तपासणीतून उघड झाले आहे.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना ठेवले अंधारात

लोटली येथे झालेल्या अपघात प्रकरणाला घातपाताची किनार आहे, ही बातमी पोलिसांनी दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्यापासून लपवून ठेवली, अशी माहिती आता उघड झाली आहे. प्रसार माध्यमांवर बातमी आल्यानंतरच सावंत यांना खरा प्रकार समजला. त्यांनी आदेश दिल्यानंतरच पोलिस तपासाची चक्रे झपाट्याने फिरू लागली, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT