Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime: वाढदिवसाच्या पार्टीत 2 अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार; कळंगुट येथून दोघांना अटक

Goa Crime News: काही दिवसांपूर्वी आगशी येथील तीन मुली सकाळी घरातून निघून गेल्या होत्या. त्यातील एका मुलीचा वाढदिवस होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आगशी येथील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आगशी पोलिसांनी म्हापशातील दोघा तरुणांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांचीही पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत आगशी पोलिस स्थानकात संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची माहिती उघड न करण्याची ताकीद दिली आहे.

काही दिवसांपूर्वी आगशी येथील तीन मुली सकाळी घरातून निघून गेल्या होत्या. त्यातील एका मुलीचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी दोघा मित्रांसमवेत त्या एका ठिकाणी गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या आल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी आगशी पोलिस गाठले होते.

या प्रकरणाची दखल घेऊन आगशी पोलिसांनी सर्व पोलिस स्थानकांना बिनतारी संदेश पाठविला. रात्री ९ च्या सुमारास या मुली कळंगुट येथे आपल्या मित्रांसमवेत आढळून आल्या. या तिन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्या पालकांच्या स्वाधीन केले होते.

पालकांनी या मुलींची चौकशी केली असता तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांची माहिती मिळवली. या चौकशीदरम्यान मुलींनी त्या तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT