Ceiling Collapsed  Dainik Gomantak
गोवा

Ceiling Collapsed At Zuarinagar: कॉलेजचे छत कोसळून ३ विद्यार्थिनी झाल्या जखमी; एमईएस कॉलेज येथील दुर्घटना

MES College Goa: भयभीत झालेल्या एका मुलीला आली घेरी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली

गोमन्तक डिजिटल टीम

झुआरीनगर येथे एमईएस कॉलेजमध्ये एका वर्गाचे सिलींग कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. जखमी विद्यार्थिनींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात उपचारांसाठी नेले. उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १०.३० वाजता सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे एमईएस कॉलेजच्या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या एका वर्गातील सिलिंगचा काही भाग अचानक कोसळला. यावेळी वर्ग सुरू होता. सिलिंगचे हे तुकडे वर्गात बसलेल्या तीन मुलींवर कोसळल्याने त्या जखमी झाल्या. त्यापैकी भयभीत झाल्याने एका मुलीला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तातडीने वर्गाबाहेर नेले.

या दुर्घटनेविषयी एमईएस कॉलेजच्या उपप्राचार्य रोचना खरंगटे यांना विचारले असता, त्यांनी क्लास रूममधील सिलिंगच्या ‘पीओपी’चा काही भाग कोसळला असल्याचे सांगितले. आम्ही विद्यार्थ्यांना लगेच बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT