Goa Election 2022 Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शुक्रवारी 3 निवडणूक अर्ज दाखल

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या काब्राल यांनी कुडचडे मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात सर्वत्र आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष विविध माध्यमातून जोरदार प्रचार करत आहेत. यातच आता निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 21 जानेवारी ते 28 जानेवरी हा अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. पहिल्या दिवशी 3 लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये मंत्री नीलेश काब्राल यांचा देखील समावेश आहे. (Goa Assembly Election 2022)

निवडणुकीच्या (Election) वेळापत्रकाची अधिसूचना जारी झाल्याने शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी दक्षिण गोव्यात (South Goa) एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या काब्राल यांनी कुडचडे मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. माजी मंत्री गोविंद गावडे यांनी प्रियोळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर उमेदवारी दाखल केली. तसेच अपक्ष उमेदवार दिग्विजय चौहान यांनी नावेली मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली.

19 मतदारसंघांचा समावेश असलेल्या उत्तर गोव्यातून (North Goa) अजून एकही अर्ज आलेला नाही. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल म्हणाले, निवडणूक आयोगाने ‘KYC’ नावाचे नवीन अ‍ॅप लॉन्च केले आहे.या अ‍ॅपवर उमेदवारांशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. यामध्ये त्यांचे प्रतिज्ञापत्र आणि गुन्हेगारी नोंदींसह अनेक गोष्टींचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी आहे. अर्जांची छाननी 29 जानेवारीला होईल तर उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया 31 जानेवारीला होईल. गोव्यात 40 मतदारसंघांसाठी 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT