पणजी: मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Styapal Malik) यांनी मुख्यमंत्र्यांवर (CM Pramod Sawant)भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तरीही भाजपा (BJP) त्याबाबत गंभीर नसल्याबाबत केजरीवाल यांनी खेद व्यक्त केला. राज्यातील भ्रष्ट मुख्यमंत्री बदलण्याऐवजी केंद्र सरकारने त्यावेळी राज्यपालच बदलला. पण, सत्य अधिक काळ लपून राहत नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर मात्र भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवणार आहोत, असे ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी कॉंग्रेसवरही सडकून टीका करताना तेही भाजपशी मिळून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांवर का कारवाई झाली नाही, असे विचारले असता, भाजपचा भ्रष्टाचार सिद्ध होईल.
मोफत तीर्थयात्रा : रविवारी ट्विट केल्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी ‘भावनिक’ गुगली टाकली. राज्यात सरकार आल्यास हिंदूंना शिर्डी-अयोध्या, ख्रिश्चनांना वालंकिणी आणि मुस्लिमांना अजमेर शरिफच्या सहलीची ऑफर त्यांनी दिली.
आतापर्यंतच्या घोषणा
1) 300 युनिटपर्यंत वीज मोफत. शेतकऱ्यांना पंपासाठी वीज माफ.
2) राज्यातील प्रत्येक घरात एका व्यक्तीला नोकरी, नोकरी मिळेपर्यंत 3000 रोजगार भत्ता, खाण अवलंबितांना कुटुंबाला 5000 रुपये.
3) धार्मिक स्थळांच्या पर्यटनाची मोफत संधी.
पैसा कुठून येणार?
आम्हाला प्रत्येकजण विचारत आहे, तुम्ही जाहीर करीत असलेल्या योजनांसाठी पैसा कुठून येणार? याचे उत्तर मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले आहे. राज्यात भ्रष्टाचारातून मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा अपव्यय होत आहे. त्यातून राज्याच्या विकासाचे नवे मॉडेल प्रस्तापित करता येईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.