Accident Cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Accident Cases in Goa: राज्यात अपघातांची मालिका सुरूच! दाबोळीतील अपघातात एक ठार, एक जखमी

दिवसभरात तीन अपघातांची नोंद झाली आहे.

Kavya Powar

Accident Death in Goa: राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. दाबोळी विमानतळाजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. ही दुचाकी कर्नाटकमध्ये नोंदणी केलेली असून यामध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेला असे दोघेही जबर जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झाल्यानंतर दोघांनाही चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, पणजीमध्ये कसिनोनजीक एका चारचाकीचा अपघात झाला आहे. माहितीनुसार, फोर्ड कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कॅसिनोसमोरील लाईट खांबाला आणि तिथेच असलेल्या दुचाकीस्वाराला कारने जोरदार धडक दिली. यामध्ये जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, आजच अपघाताची अजून एक घटना समोर आली आहे. वेर्णा येथील राष्ट्रीय महामार्गावर एका माल वाहतूक ट्रकचा तोल जाऊन ट्रक रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने यामध्ये चालकाला गंभीर इजा झाली नाही.

राज्यातील वाढते अपघात हे चिंतेचे कारण बनत चालले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: खडकावर बसला दारूच्‍या नशेत, अजस्त्र लाटांनी त्याला घेतले कवेत; मैत्रिणीच्‍या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नडले; बागा किनाऱ्यावरील घटना

Goa Electricity: वीज ग्राहकांना मिळणार दंडाचे 43 कोटी परत, पुढील बिलांतून वळते; वीज विभागाचा मोठा निर्णय

Horoscope: निर्जला एकादशीला शिवयोगाचा दुर्मिळ संयोग; कुंभ, मीनसह अनेक राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी, धनलाभाचे प्रबळ संकेत

Gold And Silver Crash: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने 1800 तर चांदी 7500 रुपयांनी स्वस्त VIDEO

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

SCROLL FOR NEXT