Accident News Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Accident: कुंकळ्ळीतील अपघातात 26 वर्षीय तरूणी ठार; ओमनीची दुचाकीला धडक

कुराडे क्लिनिकजवळ झाला अपघात

Akshay Nirmale

Cuncolim Accident: वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यात अपघात झाल्यास मृताच्या कुटूंबियांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेची घोषणा करून काही तास होत नाहीत तोवर कुंकळ्ळीत एक अपघात घडला आहे. या अपघातात एका तरूणीचा मृत्यू झाला आहे.

ऋता पै-आंगले (वय 26) असे या मृत तरूणीचे नाव आहे. ती मुळची कुंकळ्ळी येथील रहिवासी आहे. बुधवारी कुंकळ्ळीतील कुराडे क्लिनिक परिसरात हा अपघात झाला. ओमनी कारने या तरूणीच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

यात ऋता पै-आंगले या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत जास्त रक्त वाहिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दवाखान्यात त्यांना मृत घोषित करण्यात आले.

कुंकळ्ळीतील अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे या अपघाताने समोर आले आहे. विशेष म्हणजे, बुधवारी दुपारीच वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी, अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित मृताच्या कुटूंबाला भरपाई म्हणून राज्य सरकारतर्फे दोन लाख रूपये देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या योजनेतील सर्व फायली क्लियर केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT