Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa govt job: गोमंतकीय तरुणांसाठी खूशखबर! वर्षात सरकारी खात्यांतील 2,500 रिक्त पदे भरणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Sarkari Naukri: विकसित भारत आणि विकसित गोव्यासाठी गोमंतकीय जनतेने पूर्ण योगदान दिले पाहिजे असे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत य‍ांनी राज्य कर्मचारी भरती आयोगामार्फत येत्या वर्षभरात सरकारी खात्यांतील २,५०० रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यदिनानिमित्त पणजीतील जुन्या सचिवालयासमोर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. राज्यातील ‘आयटीआय’मध्ये नवीननवीन प्रगत तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कौशल्य शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करण्याचा आमचा मुख्य हेतू आहे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्वच क्षेत्रात आज गोव्याचा झपाट्याने विकास होत आहे. विकसित भारत आणि विकसित गोव्यासाठी गोमंतकीय जनतेने पूर्ण योगदान दिले पाहिजे, तसेच कृषी क्षेत्रातील बदल आणि नवनव्या योजनांमुळे राज्यातील कृषी उत्पादनात वाढ होत आहे. येणाऱ्या काळात फोंडा आणि वाळपईत कृषी कार्यालये स्थापन करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्यासाठी नऊ तालुक्यांत नव्या प्रशासकीय इमारती उभारण्यात येतील. राज्यात लवकरच पशुचिकित्सा महाविद्यालयाची स्थापना करणार असून लवकरच राज्याला १०० टक्के साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT