Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: मायनिंग ब्लॉक्सच्या लिलावात कमालीची गुप्तता; चार ब्लॉक्ससाठी 24 कंपन्या शर्यतीत?

ब्लॉक्सचा लिलाव डिसेंबर पर्यंत होणार पुर्ण

दैनिक गोमन्तक

गोव्यातील लोह खनिजाच्या चार ब्लॉक्सची लिलाव प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न आहे. याबाबत सरकारने कमालीची गुप्तता बाळगली आहे. गोवा सरकारने खाण चार ब्लॉक्सच्या लिलाव प्रक्रियेसाठी निविदा काढली आहे. आज झालेल्या लिलाव पूर्व बोली परिषदेला 24 कंपन्यांची हजेरी लावली.

(24 mining companies participate in the goa Pre-bid conference)

मिळालेल्या माहितीनुसार खाण खात्याने लिलावासाठी निविदा काढली होती. याला 24 खाण कंपन्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. यामध्ये गोव्यासह शेजारील राज्यातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पुर्ण होऊन खाण काम सुरु होईल अशी माहिती दिली आहे.

चार ब्लॉक्स पहिल्या टप्प्यात लिलावात काढणार

आठ लोह खनिज खाणींचा समावेश असलेले चार ब्लॉक्स पहिल्या टप्प्यात लिलावात काढण्यात येणार आहेत. मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशनने आपल्या अहवालात डिचोली व सत्तरी तालुक्यातील आठ खाणींचा लिलाव करता येणे शक्य असल्याचे नमूद केले आहे.

गोवा फाऊंडेशनचे खाण खात्याला पत्र

या खाणी सुरू करण्यासाठी अजून पर्यावरणीय अनुमती मिळालेली नाही आणि या अनुमतीशिवाय कुठलीही खाण सुरू करता येणार नाही, यासाठी गोवा फाऊंडेशनने खाण खात्याला पत्र लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT