Goa Missing Case Dainik Gomantak
गोवा

Goa Missing Case: नाईट आऊटसाठी बाहेर पडला अन् मध्यरात्री मेसेज केला, 'मी जीवन संपवतोय', केपे-शेळपेतील तरुण बेपत्ता

Goa Missing Case: बेपत्ता तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर केपे पोलिस आणि अग्रिशमन दलाचे जवान सावर्डे येथील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

Goa Missing Case

शेळपे- केपे येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 23 वर्षीय तरुण घरातून नाईटआऊटसाठी बाहेर पडला अन् मध्यरात्री बाहेरुनच मी जीवन संपवतोय असा मेसेज घरच्यांना केला. तेव्हापासून हा तरुण बेपत्ता असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्प प्रशांत गवस देसाई (२३, रा. दामणवाडा, शेळपे) असे या बेपत्ता तरुणाचे नाव आहे. प्रकल्प केपे येथे नाईटआऊटसाठी जात असल्याचे सांगून ईलेक्ट्रिक बाईक घेऊन घराच्या बाहेर पडला. मध्यरात्री अडीच्या सुरमारास त्याने मी आयुष्य संपवतोय असा मेसेज घरच्यांना पाठवला. घरच्यांना प्रकल्प बेपत्ता झाल्याची तक्रार केपे पोलिस स्थानकात दाखल केली.

दरम्यान, सकाळी प्रकल्पची ईलेक्ट्रिक बाईक सावर्डे येथील पुलाजवळ बेवारस स्थितीत आढळून आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्डे येथील पुलावरुन एकाने पाण्यात उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. उडी घेतलेला व्यक्ती प्रकल्पच आहे का याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.

अग्निशामक दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT