Vasco narcotic Raid Dainik Gomantak
गोवा

Vasco narcotic Raid: अमली पदार्थ विरोधी पथकाच्या छाप्यात 23 वर्षीय तरुणाला अटक; 1 किलोचा गांजा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत 23 वर्षीय रोहन सरोज याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco narcotic Raid: अवैध ड्रग्ज प्रकरणांनी गोव्याची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. वास्कोमध्ये टाकलेल्या छाप्यात एक किलो अवैध गांजा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

माहितीनुसार, अवैधरीत्या ड्रग्ज पुरवठा होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. दरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचत 23 वर्षीय रोहन सरोज याला ताब्यात घेतले आहे. रोहन हा मूळचा नवे वाड्डे येथील राहणारा असून त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख किमतीचा 1 किलो गांजा जप्त केला आहे.

पोलीस संबंधित घटनेत अजून कुणाचा सहभाग आहे का ते याचा तपास करत आहेत.

दरम्यान, राज्यातील ड्रग्ज विक्रेते तसेच दलालांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत सरकार ठाम आहे. राज्यातील अंमलीपदार्थांच्‍या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असल्यानेच गुन्ह्यांचे प्रमाण यावर्षी कमी झाले आहे.

सरकार अंमलीपदार्थ झिरो टॉलरन्स धोरणाच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. नशामुक्त समाज घडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करूया, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT