Atal Aasara Scheme
Atal Aasara Scheme Dainik Gomantak
गोवा

आदिवासी समाजाला घरबांधणीसाठी 2.14 कोटी : सुभाष फळदेसाई

दैनिक गोमन्तक

पणजी : केंद्र सरकारच्या अटल आसरा योजनेचा राज्यातील आदिवासी समाजाला घरबांधणीसाठी 2.14 कोटींची मदत करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत 225 आदिवासी कुटुंबांना ही मदत दिल्याची माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

(2.14 crores for construction of houses for tribal community in goa Subhash Phaldesai)

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अँतोनियो वाझ यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नावर फळदेसाई यांनी लेखी उत्तर दिले आहे. समाजकल्याण खात्यातर्फे घर दुरुस्तीसाठी 75 हजार आणि घर बांधणीसाठी 2 लाख रुपयांची मदत देणारी योजना राबविली जाते.

अटल आसरा योजनेचा फायदा 2018-19 मध्ये 12 लाभार्थ्यांनी घेतला, त्यानंतर 2019-20 मध्ये 93 पर्यंत लाभार्थी वाढले. 2020-21 मध्ये ते 24 पर्यंत खाली आले. 2021-22 मध्ये 38वर पोहोचली आहे.

तर सध्या यावर्षी ही संख्या 58 वर गेली आहे. 2018-19 मध्ये 9 लाख, 2018-19 मध्ये 69.95 लाख, 2020-21 मध्ये 20.50 लाख, 2021-22 मध्ये 28.50 लाख तर 2022 मध्ये 87लाख रुपये दिले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT