Court Canva
गोवा

Goa Crime: वेश्या व्यवसायातून गोळा केला 21.2 कोटी रुपयांचा गल्ला; केनियन नागरिकाची जामिनासाठी हायकोर्टात धाव

Goa Crime News: न्यूटन मायदेशी पळून जाण्याच्या तयारीत असताना दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती.

Pramod Yadav

पणजी: वेश्या व्यवसायातून २१.२ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करणाऱ्या संशयित केनियन नागरिक न्यूटन मुथुरी किमानी याला ईडीने अटक केली होती. याप्रकरणी संशयित न्यूटन याने म्हापसा न्यायालयात केलेला जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आता त्याने जामिनासाठी गोवास्थित उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत पुढील सुनावणी २४ मार्च रोजी होणार आहे.

हणजूण परिसरात पोलिसांनी वेश्या व्यवसायप्रकरणी दोन महिला दलालांना अटक केली होती. यावेळी पोलिसांनी सात महिलांची सुटका देखील करण्यात आली होती. यात हवाला आणि मनी लाँड्रिंग संशय असल्याची ईडीने ९ डिसेंबर २०२३ रोजी न्यूटन मुथुरी किमानी याला अटक केली होती. न्यूटन मायदेशी पळून जाण्याच्या तयारीत असताना दिल्ली विमानतळावर त्याला अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी याप्रकरणात इस्त्रालीट आणि विल्किस्टा अशा दोन महिलांना अटक केली होती. न्यूटनकडे इस्त्रालीट आणि विल्किस्टा यांच्याकडून मिळणाऱ्या पैसे हाताळण्याची जबाबदारी होती. यासाठी त्याने पंजाब आणि बंगळुरु येथे विविध बँकेत ११ खाती उघडल्याची माहिती आहे. या खात्यांमध्ये वेश्या व्यवसायातून कमवलेले पैसे जमा होत होते.

वेश्या व्यवसायातून सुमारे २१.२ कोटी रुपये गोळा करण्यात आले, न्यूटनने एजंटमार्फत ३.४ कोटी रुपये केनियात पाठवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ईडीने याप्रकरणी तपासपूर्ण करुन इस्त्रालीट, विल्किस्टा आणि न्यूटन यांच्यासह फरार हेलन जेम्स विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT