coronavirus4 
गोवा

सहा दिवसांत २१ ‘कोविड’चे बळी

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या सहा दिवसांत २१ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. मागील चोवीस तासांत दोघांचा बळी गेला. त्‍यामुळे राज्यात आजवर झालेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची संख्या ६६ वर पोहोचली आहे.

आज दिवभरात १९१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर १६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे राज्यात २०९५ जण सक्रिय कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनामुळे आज मृत्यू झालेल्‍यात वास्को येथील ६७ वर्षीय आणि ७३ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या दिवशी चार देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये ६९ जणांना ठेवण्यात आले. २६२६ जणांच्‍या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २१३७ जणांचे अहवाल हाती आहेत.

रेल्‍वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले १३ रुग्ण आहेत. डिचोलीत १२, साखळीत ६०, पेडणेत ३७, वाळपईत ६७, म्हापसात ७६, पणजीत ७८, बेतकी येथे १७, कांदोळीत ५७, कोलवाळ येथे ४३, खोर्लीत ५२, चिंबल येथे १२०, पर्वरीत ४८, कुडचडेत ३५, काणकोणात १४, मडगावात १५६, वास्कोत ३६८, लोटलीत ३५, मेरशीत २६, केपेत ४०, सांगेत १९, शिरोडा येथे ४०, धारबांदोडा येथे ३१, फोंडा येथे १०८ आणि नावेलीत ४७ रुग्ण आणि राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आढळल्‍याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू
१ ऑगस्ट ३
२ ऑगस्ट ५
३ ऑगस्ट ३
४ ऑगस्ट ४
५ ऑगस्ट ४
६ ऑगस्ट २

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT