54th IFFI 2023 :  Dainik Goamantak
गोवा

54th IFFI 2023 : ‘धकधक गर्ल’ माधुरीची ‘मोहिनी’; दिग्गज कलाकारांची IFFI ला उपस्थिती

54th IFFI 2023 : ५४वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला कालपासून गोव्यात सुरुवात

गोमन्तक डिजिटल टीम

54th IFFI 2023 : पणजी, ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात सोमवारी (ता.२०) चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती; पण प्रेक्षकांवर मोहिनी घातली ती ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांनी. त्यांचे नृत्य पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी माधुरी यांचा खास सत्कारही करण्यात आला.

श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये अनेक रसिकांनी ‘इफ्फी’च्या उद्‌घाटन समारंभात येऊन नाचगाण्यांचा आस्वाद घेतला.  सायंकाळी ४.३० वाजल्यापासून स्टेडियमवर ‘रेड कार्पेट’वरून अनेक सिनेअभिनेता, दिग्दर्शक, अभिनेत्रींचे आगमन झाले. त्यात सनी देओल, शाहीद कपूर, दिव्या दत्ता, माधुरी दीक्षित नेने, करण जोहर, पंकज त्रिपाठी, श्रेया घोषाल, शेखर कपूर अशा अनेक दिगग्ज कलाकारांचा समावेश होता.

माधुरी दीक्षित भावुक!

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात सोमवारी (ता.२०) भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी विशेष सन्मान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना माधुरी दीक्षित भावुक झाल्या. अनेक दशकांपासून माधुरी दीक्षित यांनी आपल्या अभिनयाची अनोखी छाप सोडली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्यासह राज्यमंत्री माहिती आणि प्रसारण डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

आकर्षक रोषणाई

स्टेडियमच्या आत कार्यक्रमासाठी खास आकर्षक रोषणाई केली होती. तीन स्क्रीन्स बसवण्यात आले होते. ज्यातून तिन्ही बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना थेट व्यासपीठावरील कार्यक्रम दिसत होते.

साउंड सिस्टिमही जबरदस्त होती. अगोदरच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी, तेलगू अशा गाण्यांवर विविध कलाकारांनी आपली नृत्यकला सादर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

SCROLL FOR NEXT