2000 corona tests complete a day in Goa
2000 corona tests complete a day in Goa 
गोवा

गोव्यात दिवसभरातील चाचण्यांनी २ हजारांचा टप्पा ओलांडला

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात कोरोनाविषयीच्या प्रतिदिन घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये घट झाली होती. अलिकडे दीड हजार ते दोन हजारच्या खाली लोकांच्या चाचण्या होत होत्या. परंतु आज दोन हजारांच्यावर चाचण्या झाल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात २ हजार २२ एवढ्या चाचण्या झाल्याचे आरोग्य सेवा संचलनालयाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मागील चोवीस तासांत कोरोनाचा एक बळी गेल्याची नोंद झाली असून, राज्यातील आत्तापर्यंत बळींची संख्या ७४४ एवढी झाली आहे.

दिवसभरात ८० पॉझिटिव्ह सापडले असून, ६१ जणांना घरगुती विलगीकरणात राहून उपचार घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर २४ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. प्रकृती सुधारामुळे रुग्णालयातून ७० जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ८११ एवढी झालेली आहे.  राज्यभरातील आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात एकूण ८६० एवढे रुग्ण ॲक्टिव पॉझिटिव्ह आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मडगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रुग्णसंख्या वाढली असून, ती शंभराच्यावर (१०३) गेली आहे. मृतामध्ये मडगावच्या ८७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यावर्षातील पहिल्यांदाच दिवसाला दोन हजार जणांच्या (२,०२२) चाचण्या झाल्याचे आज नोंदले आहे. मागील सात दिवसांवर नजर टाकल्यास ता. ३० डिसेंबर रोजी १,९६१, दि. ३१ डिसेंबरला १ हजार ८२०, ता. १ जानेवारी २०२१ रोजी १ हजार ४६३, ता. २ रोजी १ हजार ६२०, ता. ३ रोजी १ हजार ३२२, ता. ४ रोजी १ हजार १७७ आणि ता. ५ रोजी २ हजार २२ अशी आकडेवारी दिसून येते.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Update: कार्मुली येथे घराला आग, एक लाखांचे नुकसान

Margao News : भाजप वादळापुढे काँग्रेसचा प्रचार फिका; धेंपेंच्या अखेरच्या प्रचार सभेत 'रेकॉर्ड ब्रेक' गर्दी

Israel Air Strikes Video: हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा इस्रायलने घेतला बदला; लेबनॉनवर केला जोरदार हवाई हल्ला

Valpoi News : कामगार कायद्यांतूनच कामगारांचे भविष्य सुरक्षित : ॲड. यशवंत गावस

Bicholim News : देशाच्या विकासासाठी भाजपला मत द्या : डॉ. चंद्रकांत शेट्ये

SCROLL FOR NEXT