Bicholim News : देशाच्या विकासासाठी भाजपला मत द्या : डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : डिचोलीत मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, मताधिक्क्याचा विश्वास
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, भाजपशिवाय देशाला पर्याय नाही. भाजपला मत म्हणजेच देशाच्या उज्वल भवितव्यासाठी मत. देशाला उच्चपदावर विराजमान करायचे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भाजपतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मुळगाव येथे आज सकाळी घेतलेल्या पत्रकार पारिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ, भाजप मंडळाचे

अध्यक्ष विश्वास गावकर, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर, वल्लभ साळकर, मेणकुरेचे सरपंच गुरुदास परब, अडवलपालचे सरपंच गजानन पालकर, मुळगावचे कार्यकारी सरपंच गजानन मांद्रेकर, पंच सौ. तृप्ती गाड, साळच्या पंच वैष्णवी परब आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Bicholim
Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

‘पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा’ :

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव आर्थिक सहकार्य मिळालेले आहे आणि पुढेही मिळणार आहे. केंद्र आणि राज्यातील मिळून डबल इंजिन सरकारने मार्गी लावलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प पाहता यावेळीही केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येणार, असा विश्वास डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त करून लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला मत देऊन नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्थान बळकट करा, असे आवाहन केले.

‘डिचोलीत मतांची आघाडी निश्चित’

भाजपतर्फे डिचोली मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचार करण्यात आला असून घरोघरी भाजपच्या संकल्पपत्राचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. मतदारांचा प्रतिसाद पाहता, यावेळीही डिचोली विधानसभा मतदारसंघात भाजपला मतांची आघाडी निश्चितच मिळणार, असा आशावाद विश्वास गावकर यांनी व्यक्त केला.

डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा विजय निश्चित असून केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेवर येणार, असा विश्वास व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com