Goa Orphanage Suicide Case Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील अनाथाश्रमात 20 वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल

गेल्या दोन वर्षांतील याच संस्थेतील आत्महत्येची ही दुसरी घटना

दैनिक गोमन्तक

पणजी : जुने गोवे येथील एका अनाथाश्रमात 20 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दोन वर्षांतील याच संस्थेतील आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. त्याच्या या आत्महत्येमुळे अनाथाश्रमातील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त होत आहे. पोलिस तपास सुरू आहे. जुने गोवा पोलिस सूत्रांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास अनाथाश्रमातील खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेत हा मुलगा आढळून आला. (20-year-old boy commits suicide in Goa orphanage)

त्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी जाऊन त्याचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या मुलाने कठोर पाऊल उचलण्यामागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात व उपजिल्हाधिकारी आणि दोन साक्षीदारांसह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाची तपासणी करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT