Cm Pramod Sawant Dainiik Gomantak
गोवा

Kulem News : सावर्डेत दोन आध्यात्मिक पर्यटन प्रकल्प साकारणार ! मुख्यमंत्री

Kulem News : आमदार गावकर यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Kulem News : कुळे सावर्डे मतदारसंघाचा येत्या पाच वर्षांत विकासात्मक दृष्टिकोनातून पूर्णतः कायापालट केला जाणार असून या मतदारसंघात दोन अाध्यात्मिक पर्यटन प्रकल्प साकारले जातील आणि आमदार गणेश गावकर यांनी मतदारांना दिलेली सर्व आश्वासने निश्चितच पूर्ण केली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

धारबांदोड्यातील आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या वाढदिनानिमित्त आज शनिवारी आयोजित कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी आमदार गणेश गावकर यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गणेश गावकर यांनी सावर्डे मतदारसंघात आमदार म्हणून काम करताना सामाजिक, शैक्षणिक विकास चालवला आहे. धारबांदोड्यातील महाविद्यालय आणि लवकरच होणारे फोरेन्सिक सायन्सचे विश्वविद्यालय, राष्ट्रीय न्यायिक महाविद्यालय यामुळे या मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल हे नक्की.

त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, तुमचा विश्वास गणेश भाऊंवर आहे तो वृद्धींगत करा,लोकसभा निवडणुकीत सावर्डेतून भाजपला सर्वाधिक मतदान द्या, असे आवाहन डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आमदार गणेश गावकर यांनी सावर्डेचा विकास करण्यास कटिबध्द असून मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने हा विकास साधला जाईल, असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. गणेश गावकर यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जितेंद्र नाईक यांनी केले. अरूण बिचाेलकर यांनी आभार मानले,

विकासकामांचा धडाका :

आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या वाढदिनी ९ रोजी सावर्डे मतदारसंघात विविध विकासकामे सुरू करण्यात आली. धावकोण येथे रवळनाथ जल्मी देवस्थानच्या सभागृह दुरुस्ती कामाचा शुभारंभ सकाळी ११ वा. करण्यात आला.

दाभाळ पंचायतीत मल्हारीमळ येथे गटार बांधकामास ११.२० वा. प्रारंभ झाला. प्र. ६ मधील अंतर्गत रस्त्यावर हॉटमिक्स कामाचा शुभारंभ ११.४० वा. करण्यात आला. दुपारी १२ वा. माटोजे येथे पाणी प्रकल्पाच्या सेंड फिल्डरचे तर मेटावाडात कूपनलिकेचे उद्‍घाटन करण्यात आले.

शुभेच्छांचा वर्षाव

आमदार डॉ.गणेश गावकर यांना त्यांच्या चाहत्यांसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री गोविंद गावडे, ॲड.नरेंद्र सावईकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री महादेव नाईक,

आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार संकल्प आमोणकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, अनुसूचित जमातीचे आयुक्त दीपक करमलकर तसेच भाजपचे इतर नेत्यांनी आमदार गावकर यांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT