Uttar Pradesh 2 missing Minors Found in Goa  Dainik Gomantak
गोवा

बेपत्ता झालेले 2 अल्पवयीन थेट गोव्यात; अनोळखी नंबरवरून फोन कॉल आला अन्...

लिफ्ट मागून कारमधून गाठला गोवा

Akshay Nirmale

Shahjahanpur News: उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील पोवायान शहरातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता, पण तरीही ही मुले कुठेही आढळून आली नाहीत.

दरम्यान, हे अल्पवयीन युवक गोव्यात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुटूंबीयांना सुटकेचा निश्वास टाकला असून मुलांना आणण्यासाठी कुटूंबीय गोव्याला रवाना झाले आहेत.

पोवायान येथून बेपत्ता झालेले हे अल्पवयीन युवक कारचालकाकडे लिफ्ट मागून थेट गोव्याला गेले. हे दोघेही युवक पोवायानमधील मोहल्ला छावणी येथील रहिवासी आहेत. ते दोघेही 11 डिसेंबर रोजी बेपत्ता झाले होते.

यातील एक जण 13 वर्षांचा असून दुसरा 14 वर्षांचा आहे. यातील एक जण बेकरीमध्ये काम करत होता. दरम्यान त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.

दरम्यान, एका अनोळखी नंबरवरून एक कॉल या कुटूंबियांना आला. संगमरवरी फरशांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याने हा फोन कॉल केला होता. त्याने दोन्ही युवक त्याच्या कारमध्ये असल्याचे या कुटूंबियांना कळवले.

आपल्याकडे या युवकांनी लिफ्ट मागितली, त्यामुळे मी त्यांना लिफ्ट दिली. आता आम्ही गोव्यात आहोत, असे या व्यापाऱ्याने त्या कुटूंबियांना सांगितले.

व्यापाऱ्याने सांगितले की, दोघेही तरुण शाहजहांपूरहून ट्रेनने दिल्ली आणि तेथून पलवलला पोहोचले होते. दोन तरुणांनी त्याच्या कारमध्ये लिफ्ट घेतली होती. त्यांच्याशी संभाषणातून ते घरातून पळून आल्याचे समजले.

त्यांना संशय वाटल्याने त्यांनी या मुलांकडून त्यांची सर्व माहिती विचारून घेतली. त्यांच्या कुटुंबाची आणि मोबाईल क्रमांकाची माहितीही घेतली. नंतर जेव्हा दोन्ही युवक गाडीत झोपले होते तेव्हा त्या व्यापाऱ्याने कुटुंबीयांना फोन करून त्यांच्या मुलांबाबत माहिती दिली.

कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनीही संबंधित व्यापाऱ्याशी बोलणे केले. व्यापाऱ्याने, दोन्ही किशोरवयीन युवक सुरक्षित असल्याचे सांगितले. या युवकांच्या कुटुंबातील सदस्यांना गोव्यात जाण्याची तयारी केली.

या अल्पवयीनांना परत घेऊन जाण्यासाठी ते रवाना झाले आहेत. पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रदीप कुमार राय यांच्या माहितीनुसार, हे दोघाही अल्पवयीन युवकांचे घर सोडून जाण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: बुधाची राहुच्या नक्षत्रात एन्ट्री, 'या' 3 राशींच्या बँक बॅलेन्सची गाडी सुस्साट; व्यापारात भरभराट अन् नोकरीत प्रमोशनचा योग

Mardol: सफर गोव्याची! ओहोळ-नाल्यांचं संगीत ऐकणारं, फुलांचा सुगंध घेऊन येणारं 'म्हार्दोळ'

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

"बाबर आझमकडे सिक्स मारण्याची क्षमताच नाही...", LIVE मॅचमध्ये मोहम्मद कैफनं काढली लायकी Watch Video

Bicholim Accident: विजयनगर–कारापूर येथे भरधाव कारची पादचारी महिलेला धडक

SCROLL FOR NEXT