Houses Collapsed in Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगावात घरांची पडझड; दगड पडून महिला जखमी

Houses Collapsed in Margao: आतापर्यंत मडगावात अशा चार घटना घडल्‍या असून नावेलीत दोन घटना घडल्‍या

गोमन्तक डिजिटल टीम

मागचे काही दिवस पडत असलेल्‍या मुसळधार पावसामुळे मडगावात आणखी दोन घरांची पडझड झाली. आके येथे या पडझडीत एक महिला जखमी झाली असून तिच्‍यावर इस्‍पितळात उपचार सुरू आहेत. भिंतीचे दगड या महिलेच्‍या पायावर पडल्‍याने तिचा पाय फ्रॅक्‍चर झाला.

दुसरी घटना हाेली स्‍पिरिट चर्चकडे घडली आहे. ही दोन्‍ही घरे मातीची असल्‍यामुळे पावसात फुगून त्‍यांच्‍या भिंती कोसळल्‍या, असे सांगितले जाते.

आतापर्यंत मडगावात अशा चार घटना घडल्‍या असून नावेलीत दोन घटना घडल्‍या. त्‍यात एका युवकाचा मृत्‍यू झाला असून दोन महिला जखमी झाल्‍या आहेत. याशिवाय रायेश चेंबर्स या इमारतीवर डाेंगराची दरड पडल्‍याने एकूण सात फ्‍लॅट्‌सची हानी झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी गील सौझा यांनी दिली. सासष्टीत झाडे उन्‍मळून पडण्‍याच्‍या कित्‍येक घटना घडल्‍याची माहितीही साैझा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT