Indian Women’s League (IWL) 2 in Goa Dainik Gomantk
गोवा

IWL-2: दोन महिला फुटबॉलपटूंवर गोव्यातील हॉटेलमध्ये शारीरिक अत्याचार; AIFF च्या दीपक शर्मांवर आरोप

Indian Women’s League (IWL) 2 in Goa: तक्रारदार दोन्ही महिला खाद एफसीच्या फुटबॉलपटू असून, शुक्रवारी त्यांनी एआयएफएफच्या स्पर्धा समितीकडे तक्रार केली

Pramod Yadav

Indian Women’s League (IWL) 2 in Goa

इंडियन वुमेन्स लीग (IWL) 2 दरम्यान दोन महिला फुटबॉलपटूंवर गोव्यातील हॉटेलमध्ये शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार समोर आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) कार्यकारी समिती सदस्य दीपक शर्मा यांच्या विरोधात अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारदार दोन्ही महिला खाद एफसीच्या फुटबॉलपटू असून, शुक्रवारी त्यांनी एआयएफएफच्या स्पर्धा समितीकडे तक्रार केली. गुरुवारी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही महिला फुटबॉलपटूंनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्रीचे जेवण आटोपल्यावर आम्ही आमच्या खोलीत अंडी उकडण्यासाठी गेलो. यामुळे रागावलेल्या दीपक शर्माने आमच्या खोलीत घुसत आम्हाला थप्पड मारली व शारीरिक हल्ला केला. तक्रारीला तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिला आहे.

वरिष्ठ अधिकारी दीपक शर्मा नेहमी मद्यधुंद अवस्थेत असतात. मागच्या लीगमध्ये देखील संघ हिमाचल ते दिल्लीला गेला होता त्यावेळी त्यांनी मद्य घेतले होते. आमच्यासमोरच मद्यपान करत होते, अशी तक्रार खेळाडूंनी केलीय.

दरम्यान, हिमाचल प्रदेश स्थित खाद क्लब IWL 2 मध्ये भाग घेण्यासाठी गोव्यात आहे. दीपक शर्मा हिमाचल प्रदेश फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस आणि AIFF च्या स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आहेत.

खेळडूंनी त्यांना जीवाची भीती वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर गोवा फुटबॉल असोसिएशनचे अधिकारी हॉटेलमध्ये दाखल झाले. दरम्यान, संघ व्यवस्थापकांनी खंळाडूंच्या सुरक्षतेची लेखी हमी दिली आहे.

सर्व मुलींची जबाबदारी आम्ही घेतो आणि सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहोचवले जाईल, काहीच चुकीचे होणार नाही, अशी लेखी हमी व्यवस्थापक नानालिता शर्मा यांनी दिली आहे.

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या मार्फत याबाबत म्हापसा पोलिसांत लेखी तक्रार देण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वतीने महिला फुटबॉलपटूंच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.

महासंघाच्या वतीने तक्रारीचे दखल घेतली असून, अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे वालंका आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Sadetod Nayak: डाग नसलेले उमेदवार काँग्रेसने देणे गरजेचे, त्यांनी विश्वासार्हता गमावली; भाजप निश्चितपणे पुन्हा जिंकेल

SCROLL FOR NEXT