Goa Theft Case 
गोवा

Goa Theft Case: घरात कोणी नसल्याची संधी साधली, नेपाळच्या डिलिव्हरी बॉईजकडून गोव्यात दोन लाखांची चोरी

Goa Theft Case: पोलिसांना प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना अटक केली.

Pramod Yadav

Goa Theft Case

घरात कोणी नसल्याची संधी साधत दोन डिलिव्हरी बॉईजकडून नेरुळ येथील एका फ्लॅटमध्ये चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरटे घरातून 1.90 लाखांचे किंमती साहित्य चोरी करुन फरार झाले आहेत. दोघेही नेपाळचे रहिवाशी असून, कामानिमित्त गोव्यात वास्तव्यास आहेत.

मोहन चितर राज (वय २०) आणि बिरात झाक बहाद्दुर बासनेत (वय २३) (दोघेही रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या दोघांनी नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहलकुमार पटेल (वडोदरा, गुजरात) यांनी आठ जून रोजी याबाबत तक्रार दाखल केली. पटेल घर बंद करुन बाहेर गेल्या असता, डिलिव्हरी बॉईजनी संधी साधत फ्लॅटमध्ये प्रवेश केला. व दोन मॅकबुक लॅपटॉप, अॅपलचा एअरपॉड, नाईकीचे शूज आणि पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केली.

पोलिसांना प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदार राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता दोन डिलिव्हरी बॉईजनी घरात प्रवेश करत मुद्देमाल चोरी केल्याचे समोर आले. चोरट्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

SCROLL FOR NEXT