ATM Robbery in Ponda Dainik Gomantak
गोवा

ATM Robbery : फोडता न आल्यामुळे चोरट्यांनी 2 एटीएम मशीन लांबवली

फोंडा तालुक्यात एकाच रात्री एक-दोन नाही तर तब्बल तीन चोऱ्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ATM Robbery : फोंडा तालुक्यात एकाच रात्री एक-दोन नाही तर तब्बल तीन चोऱ्या झाल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी खांडोळ्यातील एक मंदिर लुटलं. यासोबतच म्हार्दोळ परिसरातही एका दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. तर उसगाव तिस्क परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडता न आल्यामुळे पळवल्याची घटना उघडकीस आली आहे.

तिस्क - उसगाव येथे झाली असून चोरट्यांनी एचडीएफसी आणि कॅनरा बँक अशा दोन बँकांची एटीएम रात्री पळवली. चोरट्यांनी जवळच असलेल्या कुळण येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी ही एटीएम फोडली. दोन्ही एटीएम मधून किती पैसे पळवले ते समजू शकले नाही. पोलिसांनी ही दोन्ही मशीन ताब्यात घेतली असून त्याच्यावरुन हाताचे ठसे किंवा अन्य काही पुरावे मिळतात का याचा शोध पोलीस घेत आहेत.

दुसरीकडे कुंकळ्ये - म्हार्दोळ नारायणवाडा येथे रात्री एका दुकानात शिरुन चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. दुकानदाराला संशय आल्याने त्याने धाव घेतल्याने चोरट्यांनी फ्रीजमधील बाटल्यांचा मारा त्याच्यावर केला. अखेर दुकानदाराने आरडाओरडा केल्याने आपल्या दुचाकी तिथेच सोडून चोरट्यांनी पोबारा केला आहे. तर खांडोळ्यातील प्राचीन गणेश मंदिरावर मध्यरात्री दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मूर्तीची प्रभावळ, मुकुट, हात, एका पायाचे पाऊल, अक्षयपात्र, सूर्य, चंद्र प्रतिमा, रथाचे काही साहित्यही घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेत अंदाजे 10 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT