Turtles Dainik Gomantak
गोवा

कासवसंवर्धन केंद्रातून आतापर्यंत कासवाच्‍या 193 पिल्लांना जीवदान

गालजीबाग, आगोंद किनारी 20 सागरी कासवांचे आगमन

दैनिक गोमन्तक

काणकोण: गालजीबाग व आगोंद सागरी कासवसंवर्धन केंद्रातून आतापर्यंत 193 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्‍यात आली आहेत. या दोन्‍ही किनाऱ्यांवरील 20 सागरी कासवांचे आगमन होऊन त्यांनी 2049 अंडी घातली आहेत.

गालजीबाग येथील एका घरट्यातून 118 अंड्यांपैकी 54 अंड्यांतून पिल्ले बाहेर आली. त्‍यांना काल 26 रोजी समुद्रात सोडण्यात आले. उर्वरित अंड्यांतून पिल्ले बाहेर येण्याची प्रतीक्षा असल्याचे वन खात्याच्या वन्यप्राणी विभागाचे

खोतीगाव अभयारण्याचे क्षेत्रीय वनाधिकारी अनंत वेळीप यांनी सांगितले.

अंडी घातल्यानंतर अंड्यांतून पिल्ले बाहेर येण्यास 45 ते 60 दिवसांचा कालावधी लागतो. किनाऱ्यावरील तापमान व अन्य हवामान विषयक घटकावर ते अवलंबून असते, असे वेळीप म्‍हणाले. घरट्यातून पिल्ले बाहेर आलेली पाहताना व ती समुद्रात सोडताना पाहण्यासाठी आगोंद व गालजीबाग किनाऱ्यावर देशी व परदेशी पर्यटकांची गर्दी उसळतआहे.

त्याचा फायदा घेऊन पर्यटन व वन खात्याने संयुक्तपणे सागरी कासव महोत्सव गालजीबाग, आगोंद तसेच मोरजी येथे आयोजित करून ‘इको टुरिझम’ पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट अधिक गडद होणार

Monsoon Update: 19 जून उजाडला, तरी पावसाचा पत्ता नाही; पुढील काही दिवस उष्ण व दमट हवामान, शेतकरी चिंतेत

Goa Police Recruitment: गुणवत्तेला प्राधान्य! गोवा पोलिस भरतीत मोठा बदल; आता थेट दिल्लीत होणार उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण

Tarun Tejpal Case: तरुण तेजपाल प्रकरणात हायकोर्टात अचानक काय घडलं? सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विधानाने मोठी खळबळ

Pakistan Crime: पवित्र गुरुद्वारात रक्ताचा सडा! पाकिस्तानात शिख दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या; आक्रमक भाजपची आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हस्तक्षेपाची मागणी

SCROLL FOR NEXT